Tuesday, October 27, 2009

मी एकटा .....


स्वप्नांच्या जगात,
भग्न स्वप्नांच्या ,
तुकड्यात मी एकटा …।

न जुळलेल्या सुरात,
सुरांच्या हरवलेल्या गावात,
मी एकटा …।

तिने दिलेल्या वचनात,
तोडून गेलेल्या बंधनात,
मी एकटा …।

माझ्या विचित्रपणांत,
सगळ्यांपासुन दुरावलेल्या विश्वात,
मी एकटा …।

________ मृगजळ
____________ १७ सप्टेंबर २००९

अबोला



एकमेकांशी बोलण्याची,
दोघांनाही आस आहे;
ही एक गोष्ट
आपल्यामध्ये खास आहे

दोघांची आवडही
बरीच सारखी आहे ;
म्हणूनच आपलं कुठेतरी,
सुत जुळत आहे

आपला अबोलाही ,
खोटा-खोटाच आहे;
सुरुवात कुठून करायची ?
प्रश्न दोघांनाही आहे.

अबोल्याताही आता,
बरच काही बोलणं आहे;
नजरेतले भाव टिपण्याचं,
अजब हे तंत्र आहे.

----------- मृगजळ
२१-२४ ऑगस्ट २००९

Sunday, October 25, 2009

. . . . प्रेमातले















ते हसणे प्रेमातले,
हसताना डोळ्यात येणारे पाणी प्रेमातले;
ते रडणे प्रेमातले,
रडताना पाणी थांबवणे प्रेमातले १

ते बघणे प्रेमातले,
बघताना नजर चुकवणे प्रेमातले;
ते डोळे बंद प्रेमातले,
बंद डोळ्यात तिला बघणे प्रेमातले २

ते पडणे प्रेमातले,
पडुनही सुखवाने प्रेमातले;
ते सुखावने प्रेमातले,
सुखावून जखमेवर फुंकर मारणे प्रेमातले ३

ते रुसणे प्रेमातले,
रुसल्यावर लटकं रागावणे प्रेमातले;
ते रागवणे प्रेमातले,
रागात नाक मुरडणे प्रेमातले ४

ते लाजणे प्रेमातले,
लाजुन “ईश्शं” म्हणने प्रेमातले;
ते मधाळ शब्द प्रेमातले,
शब्दांनी घायाळ करने प्रेमातले ५

________________ मृगजळ
________________ १९ जून २००९ - २२ जुलै २००९

Thursday, October 1, 2009

हा एक क्षण . . . . .



हा एक क्षण,
कधीही न विसरण्याचा,
मनाच्या गाभार्यात जपून ठेवण्याचा

हा एक क्षण,
नाती जपण्याचा,
भविष्याच्या वाटेवर, भुतकाळात रमण्याचा

हा एक क्षण,
एकत्र फोटो काढण्याचा,
अन फोटो मिळाल्यावर त्यात स्वताला शोधण्याचा

हा एक क्षण,
डोळे पाणावण्याचा,
मित्रांच्या घोळक्यात अश्रु लपवण्याचा

हा एक क्षण,
मित्रांना कोन्टँक्ट ठेवण्यासाठी सल्ला देण्याचा,
‘चल बाय’ म्हणत तिथेच घुटमळण्याचा

हा एक क्षण,
भरल्या मनाने निरोप घेण्याचा,
भांडलेल्या मित्रालाही शुभेच्छा देण्याचा

हा फ़क्त एकच क्षण,
भर-भरून जगण्याचा,
कुणीही न चुकवण्याचा ……….

____________________मृगजळ
______________ १८-१९ ऑगस्ट २००९
( फायनल इयरचा रीसल्ट लागल्यावर सुचलेले काही शब्द )