Thursday, November 4, 2010

तिच्याही नकळत . . . .




घेवून गेली सर्वस्व ती,
तिच्याही नकळत || १ ||

तुडवली स्वप्नं पायदळी तिने,
तिच्याही नकळत || २ ||

सावरल्या हातांनी लोटले गर्तेत तिने,
तिच्याही नकळत || ३ ||

तोडले मनाचे पाश सारे,
तिच्याही नकळत || ४ ||

होवून गेलो मी तिचा,
तिच्याही नकळत || ५ ||

ठेवले अंतर मजपासून तिने,
समजलेच नाही, कसे?
माझ्याही नकळत ||


________ मृगजळ
___________ ७ डिसेंबर २००९

Saturday, March 27, 2010

संबंध येतोच कुठे ?

 
मी तिच्याकडे बघणे टाळतो,
तिही माझ्याकडे बघणे टाळते,
मग नजरेतले भाव टिपण्याचा संबंध येतोच कुठे ?

ति माझ्याशी बोलण्यासाठी तेवढी उत्सुक नसते,
मीही माझ्याकडे बघुन तिच्याशी बोलणे टाळत असतो,
मग बोलण्याचा संबंध येतोच कुठे ?

तिही तिच्यात गुंतुन गेलेली,
मीही माझ्या विश्वात गुंतुन गेलेला,
मग एकमेकांना जाणुन घेण्याचा संबंध येतोच कुठे ?

खरंतर मी तिला डोळ्यांत साठवुन ठेवलंय,
मनातल्या मनात तिच्याशी खुप बोलुन घेतलंय,
सौंदर्यालाही तिच्या, केंव्हाच कवितेत उतरवलंय,
मग तिने फक्त माझीच व्हावं, अशी अपेक्षा करण्याचा संबंध येतोच कुठे ?

________  मृगजळ
___________ २७ डिसेंबर २००७

Sunday, March 14, 2010

मला सवय आहे . . . . .


मला सवय आहे,
दु:खात जगण्याची ;
विखुरलेल्या स्वप्नात,
रमून जाण्याची.

मला सवय आहे,
खरे बोलण्याची ;
ठस-ठसणाऱ्या जखमेवर,
मायेने फुंकर मारण्याची.

मला सवय आहे,
पडद्याआड रडण्याची ;
पडद्यावर मात्र,
खळखळून हसण्याची.

मला सवय आहे,
सतत पडण्याची ;
पडतानाही दुसर्याला,
आधार देण्याची.

मला सवय आहे,
एकांतात राहण्याची ;
मनातली घुसमट,
मनातच शमवण्याची.
___________________ मृगजळ
_____________ १४ मार्च २०१० ( ००.१५ AM)

Tuesday, February 16, 2010

पावसाळा ( विडंबन .... गारवा )


पावसाळा ( विडंबन .... गारवा )

खिडकीत उभी राहून बघ,
बघ माझी आठवण येते का ?
चिख्खल हातात घे,
त्या चिखलाचे गोळे कर ;
बघ माझी आठवण येते का ?

तरीही नाहीच आली आठवण तर,
बाहेर पड, चिख्खल असेल;
चालत रहा चिख्खल तुडवत,
चिखलात उड्या मार,
गडाबडा लोळ त्या चिखलात,
चिख्खल उडव बाजुच्यांच्या अंगावर ;
. . . . . . बघ माझी आठवण येते का ?

तशीच घरी ये ;
कपडे बदलू नकोस,
चिख्खल पुसू नकोस,
तशीच दारात उभी रहा ;
येणारे-जाणारे बघून हसतील,
पण तू हलू नकोस
. . . . . . बघ माझी आठवण येते का ?

नवरा येईल भिजून,
बॅग घे, जर्किन तो स्वताच काढेल ;
तो विचारेल तुला चिखलाच कारण,
तू म्हण गाडी चिख्खल उडवून गेली बाजूने ;
मग तो उठून CNN लावेल,
तू तो बंद कर,
मायकेल अडमचा "f - tv" लाव ;
या पावसाळ्यात एकदातरी .........
.............. बघ माझी आठवण येते का ?

____________________ मृगजळ

Thursday, February 11, 2010

प्रीत . . . .


मनाने मनाशी साधला संवाद आहे.
हृदयाने हृदयाशी छेडली ही तार आहे.
डोळियांनि ड़ोळीयांचा तोडला हां बांध आहे.
जीवनाने जीवनाशी गायिले हे गीत आहे.
शब्दाविना बहरली अबोल ही प्रीत आहे.

____________________ मृगजळ
__________________ २९ जुलै २००९

Sunday, February 7, 2010

किती सोपं असतं . . . .

किती सोपं असतं . . .

किती सोपं असतं,
एखाद्याला नाही म्हणनं ;
स्वप्नातली वाट अर्ध्यावर सोडून,
दुसर्या स्वप्नात रमणं.

किती सोपं असतं,
एखाद्याला नाही म्हणनं ;
स्वताचा विचार करून,
समाजाची बांधिलकी सांभाळणं.

किती सोपं असतं,
एखाद्याला नाही म्हणनं ;
अळवावरच्या थेंबासारखं,
अलगद बाजूला सारणं.

किती सोपं असतं,
एखाद्याला नाही म्हणनं ;
अवघड पायवाट दिसताच,
नकळत सोपी पायवाट धरणं।
__________ मृगजळ
___________ ७ जानेवारी २०१०