Tuesday, February 16, 2010

पावसाळा ( विडंबन .... गारवा )


पावसाळा ( विडंबन .... गारवा )

खिडकीत उभी राहून बघ,
बघ माझी आठवण येते का ?
चिख्खल हातात घे,
त्या चिखलाचे गोळे कर ;
बघ माझी आठवण येते का ?

तरीही नाहीच आली आठवण तर,
बाहेर पड, चिख्खल असेल;
चालत रहा चिख्खल तुडवत,
चिखलात उड्या मार,
गडाबडा लोळ त्या चिखलात,
चिख्खल उडव बाजुच्यांच्या अंगावर ;
. . . . . . बघ माझी आठवण येते का ?

तशीच घरी ये ;
कपडे बदलू नकोस,
चिख्खल पुसू नकोस,
तशीच दारात उभी रहा ;
येणारे-जाणारे बघून हसतील,
पण तू हलू नकोस
. . . . . . बघ माझी आठवण येते का ?

नवरा येईल भिजून,
बॅग घे, जर्किन तो स्वताच काढेल ;
तो विचारेल तुला चिखलाच कारण,
तू म्हण गाडी चिख्खल उडवून गेली बाजूने ;
मग तो उठून CNN लावेल,
तू तो बंद कर,
मायकेल अडमचा "f - tv" लाव ;
या पावसाळ्यात एकदातरी .........
.............. बघ माझी आठवण येते का ?

____________________ मृगजळ

Thursday, February 11, 2010

प्रीत . . . .


मनाने मनाशी साधला संवाद आहे.
हृदयाने हृदयाशी छेडली ही तार आहे.
डोळियांनि ड़ोळीयांचा तोडला हां बांध आहे.
जीवनाने जीवनाशी गायिले हे गीत आहे.
शब्दाविना बहरली अबोल ही प्रीत आहे.

____________________ मृगजळ
__________________ २९ जुलै २००९

Sunday, February 7, 2010

किती सोपं असतं . . . .

किती सोपं असतं . . .

किती सोपं असतं,
एखाद्याला नाही म्हणनं ;
स्वप्नातली वाट अर्ध्यावर सोडून,
दुसर्या स्वप्नात रमणं.

किती सोपं असतं,
एखाद्याला नाही म्हणनं ;
स्वताचा विचार करून,
समाजाची बांधिलकी सांभाळणं.

किती सोपं असतं,
एखाद्याला नाही म्हणनं ;
अळवावरच्या थेंबासारखं,
अलगद बाजूला सारणं.

किती सोपं असतं,
एखाद्याला नाही म्हणनं ;
अवघड पायवाट दिसताच,
नकळत सोपी पायवाट धरणं।
__________ मृगजळ
___________ ७ जानेवारी २०१०