Saturday, March 27, 2010

संबंध येतोच कुठे ?

 
मी तिच्याकडे बघणे टाळतो,
तिही माझ्याकडे बघणे टाळते,
मग नजरेतले भाव टिपण्याचा संबंध येतोच कुठे ?

ति माझ्याशी बोलण्यासाठी तेवढी उत्सुक नसते,
मीही माझ्याकडे बघुन तिच्याशी बोलणे टाळत असतो,
मग बोलण्याचा संबंध येतोच कुठे ?

तिही तिच्यात गुंतुन गेलेली,
मीही माझ्या विश्वात गुंतुन गेलेला,
मग एकमेकांना जाणुन घेण्याचा संबंध येतोच कुठे ?

खरंतर मी तिला डोळ्यांत साठवुन ठेवलंय,
मनातल्या मनात तिच्याशी खुप बोलुन घेतलंय,
सौंदर्यालाही तिच्या, केंव्हाच कवितेत उतरवलंय,
मग तिने फक्त माझीच व्हावं, अशी अपेक्षा करण्याचा संबंध येतोच कुठे ?

________  मृगजळ
___________ २७ डिसेंबर २००७

Sunday, March 14, 2010

मला सवय आहे . . . . .


मला सवय आहे,
दु:खात जगण्याची ;
विखुरलेल्या स्वप्नात,
रमून जाण्याची.

मला सवय आहे,
खरे बोलण्याची ;
ठस-ठसणाऱ्या जखमेवर,
मायेने फुंकर मारण्याची.

मला सवय आहे,
पडद्याआड रडण्याची ;
पडद्यावर मात्र,
खळखळून हसण्याची.

मला सवय आहे,
सतत पडण्याची ;
पडतानाही दुसर्याला,
आधार देण्याची.

मला सवय आहे,
एकांतात राहण्याची ;
मनातली घुसमट,
मनातच शमवण्याची.
___________________ मृगजळ
_____________ १४ मार्च २०१० ( ००.१५ AM)