घेवून गेली सर्वस्व ती,
तिच्याही नकळत || १ ||
तुडवली स्वप्नं पायदळी तिने,
तिच्याही नकळत || २ ||
सावरल्या हातांनी लोटले गर्तेत तिने,
तिच्याही नकळत || ३ ||
तोडले मनाचे पाश सारे,
तिच्याही नकळत || ४ ||
होवून गेलो मी तिचा,
तिच्याही नकळत || ५ ||
ठेवले अंतर मजपासून तिने,
समजलेच नाही, कसे?
माझ्याही नकळत ||
________ मृगजळ
___________ ७ डिसेंबर २००९