Thursday, March 31, 2011

शापित . . . .




शापित

अपयशाच्या कुशीत,
यशाच्या स्वप्नात;
मी शापित.

पाचवीला पुजलेल्या दु:खात,
सुखाच्या शोधात,
मी शापित

मंगळाच्या कुंडलीत,
शनीच्या चक्रात,
मी शापित.

जीवनाच्या गाड्यात,
मृत्युच्या प्रतीक्षेत,
मी शापित.

________  मृगजळ
___________ १० जून २०१०

No comments:

Post a Comment