Sunday, March 14, 2010

मला सवय आहे . . . . .


मला सवय आहे,
दु:खात जगण्याची ;
विखुरलेल्या स्वप्नात,
रमून जाण्याची.

मला सवय आहे,
खरे बोलण्याची ;
ठस-ठसणाऱ्या जखमेवर,
मायेने फुंकर मारण्याची.

मला सवय आहे,
पडद्याआड रडण्याची ;
पडद्यावर मात्र,
खळखळून हसण्याची.

मला सवय आहे,
सतत पडण्याची ;
पडतानाही दुसर्याला,
आधार देण्याची.

मला सवय आहे,
एकांतात राहण्याची ;
मनातली घुसमट,
मनातच शमवण्याची.
___________________ मृगजळ
_____________ १४ मार्च २०१० ( ००.१५ AM)

No comments:

Post a Comment