तिच्याही नकळत.
तुडवली स्वप्ने पायदळी तिने,
तिच्याही नकळत.
सावरल्या हातांनी लोटले गर्तेत तिने,
तिच्याही नकळत.
तोडले मनाचे पाश सारे,
तिच्याही नकळत.
होवून गेलो मी तिचा,
तिच्याही नकळत.
पण ठेवले अंतर मजपासुन तिने,
समजलेच नाही कसे ?
माझ्याही नकळत.
__________ मृगजळ
__________ ७/१२/२००९